Vice-President Election: ‘भाजपा’चे उमेदवार जगदीप धनखड यांना ‘या’ पक्षाचा पाठिंबा

150

शनिवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. यानंतर काही वेळातच बिहारमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने (जेडीयू) एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा जाहीर केला.

(हेही वाचा – ठाकरे- शिंदे एकत्र येणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…)

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करताना असे सांगण्यात आले की, उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून जेडीयू जगदीप धनखड यांचे स्वागत करते. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नामांकनाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वागत केले आहे. जेडीयू जगदीप धनखड यांना पाठिंबा देईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. धनखर यांना उमेदवारी दिल्याबद्दल जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

तर, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनीही एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड यांचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधानांचे हार्दिक अभिनंदन. जनता दल (युनायटेड) कडून पाठिंबा आणि त्यांच्या विजयासाठी आगाऊ अभिनंदन. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै असून, ६ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.