देशात 16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आणि भारताने आज रविवारी 200 कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे. गेल्या वर्षी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून 9 महिन्यांत देशात 1 अब्ज डोस देण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 200 कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ दिल्याबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान शुभेच्छा देत काय म्हणाले…
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे ट्विट रिट्विट केले. यावेळी त्यांनी भारताने पुन्हा इतिहास रचल्याचे सांगितले. 200 कोटी लसीकरणाचा विशेष आकडा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन केले. मोदी पुढे म्हणाले, भारताच्या कोरोना लसीकरण मोहिमेला वेगवान आणि अतुलनीय बनवण्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ मिळाले आहे.
India creates history again! Congrats to all Indians on crossing the special figure of 200 crore vaccine doses. Proud of those who contributed to making India’s vaccination drive unparalleled in scale and speed. This has strengthened the global fight against COVID-19. https://t.co/K5wc1U6oVM
— Narendra Modi (@narendramodi) July 17, 2022
दरम्यान, कोरोना लस तयार करण्याच्या संपूर्ण काळात भारतातील लोकांनी विज्ञानावर उल्लेखनीय विश्वास दाखवला आहे. आमचे डॉक्टर, परिचारिका, आघाडीचे कार्यकर्ते, शास्त्रज्ञ आणि उद्योजक यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या दृढनिश्चयाचे मी कौतुक करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
Join Our WhatsApp CommunityIt's a matter of pride for us that India has crossed 2 Billion doses of #COVID19 vaccine administered so far. I congratulate the healthcare workers and the citizens on this achievement: Union Health Minister Dr Mansukh Mandaviya pic.twitter.com/8T6xODIPEn
— ANI (@ANI) July 17, 2022