Monsoon Tips : पावसाळ्यात काय खावे…काय टाळावे? या आहेत काही टिप्स…

192

पावसाळ्यात अनेक लोक तेलकट, चमचमीत पदार्थ खातात. परंतु या पदार्थांचे वारंवार सेवन केल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यात हवेत गारवा असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आहारात काही चुकीचे खाल्ले गेले तरी सर्दी, खोकला, पोटदुखीचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आहारविषयक बंधणे पाळणे अतिशय आवश्यक असते.

( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा! )

या गोष्टी खाणे कटाक्षाने टाळा…

  • पावसाळ्यात मांसाहाराचे अतिप्रमाणात सेवन करू नये किंवा शक्यतो मांसाहार टाळावा.
  • उन्हाळ्यात आपण भरपूर सलाड खातो परंतु पावसाळ्यात मात्र कोणत्याही भाज्या कच्च्या खाणे पूर्णपणे टाळावे.
  • पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते त्यामुळे तेलकट पदार्थ जास्त खाऊ नयेत.
  • पावसाळा सुरू झाल्यावर आंबा देखील पचण्यास जड जातो त्यामुळे पाऊस पडताच आंबा खाण्याचा मोह टाळावा.
  • बेसन पीठापासून, मैद्यापासून बनविलेले पदार्थ पू्र्णपणे टाळावेत.
  • उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत.
  • मोड आलेली कडधान्ये कच्ची न खाता शिजवून खाण्यालाच प्राधान्य द्यावे.
  • पावसाळ्यात लोणचं, पापड यासारखे खारवलेले पदार्थ खाल्ल्याने अनेकांना अपचनाचा त्रास होतो.
  • पाणीपुरी, पकोडे, चाट या पदार्थांचे  अतिप्रमाणात सेवन करू नये.

( हेही वाचा : Monsoon Travel : पावसाळी सुट्टी Enjoy करण्यासाठी मुंबईजवळील टॉप १० जागा!)

पावसाळ्यात काय खावे ? 

  • पावसाळ्यात भाजलेला किंवा उकाडलेला मका आवर्जून खा… हा आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे.
  • रसम म्हणजे आंबट, गोड, झणझणीत असे दक्षिण भारतीय सूप जरूर प्यावे.
  • पावसाळ्यात संसर्गाना प्रतिबंध करणाऱ्या चिंच, मेथी, लसूण, कांदा अशा पदार्थांचे सेवन करावे.
  • पावसाळ्यात उकडलेले, भाजलेले अन्न खावे.
  • पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठे जास्त खावेत

( आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.