संसद संवादाचे सक्षम माध्यम, जिथे वादविवाद, विश्लेषण, चर्चा होणे आवश्यक – पंतप्रधान मोदी

135

आजपासून (सोमवार) संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. दरम्यान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुका होत असल्याने हे अधिवेशनही महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, संसदेत खुल्या मनाने संवाद व्हायला हवा, गरज पडल्यास चर्चा, वाद-विवादही व्हायला हवे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

काय म्हणाले मोदी

संसद हे संवादाचे एक सक्षम माध्यम आहे. येथे वादविवाद, माहिती, विश्लेषण यावर बोलणे आणि चर्चा होणे आवश्यक आहे. या विषयांवर चिंतन, चर्चा करण्याची विनंती पंतप्रधान मोदींनी खासदारांना केली आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनाच्या सत्राचा अधिक वापर हा विकास कामांवर भर देण्यासाठी व्हावा आणि सदनचा अधिकाधिक उपयोग हा सकारात्मक चर्चेसाठी व्हावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

(हेही वाचा – तुम्हाला Energy Drinks पिण्याची सवय आहे? तर सावध व्हा, कारण…)

देशाचा विकास जलद गतीने होतोय

पंतप्रधान मोदी संसद भवनात दाखल झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी संवाद साधला आहे. ते पुढे असेही म्हणाले की, देशाचा विकास जलद गतीने होत आहे. सभागृहाचा सकारात्मक वापर होऊन यातून देशाच्या उन्नतीसाठी उपयुक्त काम होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय उत्तम काम होण्यासाठी सगळ्यांकडून सहकार्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

संसद देशाला दिशा देईल

मोदी म्हणाले की, हा काळ खूप महत्त्वाचा असून स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचे हे पर्व आहे. येणाऱ्या २५ वर्षात जेव्हा शतक साजरे होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल. त्यामुळे देशाला नवी ऊर्जा देण्याचे कारण ठरण्यास हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.