गुरूवार दिनांक २१ जुलैला पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पंपिंगच्या अखत्यारीत येणाऱ्या काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
( हेही वाचा : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करत तोडगा काढणे आवश्यक!)
वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग केंद्र येथे विद्युत व स्थापत्य विषयक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरुवार २१ जुलै रोजी दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा बंद असणार आहे, तर शुक्रवारी २२ जुलैला सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले.
पुढील भागातील पाणी पुरवठा असणार बंद
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक
पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community