ठाणे शहरातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील कन्हैयानगर जलकुंभास नव्याने बसविण्यात आलेली डाउनटेक पाईप मुख्य वितरण जलवाहिनीस जोडणे आवश्यक आहे. हे काम अत्यंत तातडीचे असल्याने बुधवार दिनांक २० जुलै, २०२२ रोजी सकाळी ०९.०० ते गुरुवार दिनांक २१ जुलै, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपर्यंत २४ तास कन्हैयानगर जलकुंभावरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
(हेही वाचा – वर्ध्यात पावसाचा कहर! ४२ गावांचा संपर्क तुटला, २४ तासांत १३६ मि.मी. सरासरी पावसाची नोंद)
या भागात राहणार पाणी पुरवठा बंद
या शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभा अंतर्गत कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मिकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर व स्वामी समर्थ मठ परिसर इद्यादी परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे.
पालिकेकडून नागरिकांना आवाहन
वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community