राष्ट्रपती निवडणुकीत २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

151

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता सोमवारी राज्यातील २८३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान

राष्ट्रपती निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी दहा वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी दिली.

( हेही वाचा : राज्यात ‘मॅक्सी कॅब’ला एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध )

केंद्रीय निवडणूक निरीक्षक अमित अगरवाल, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कामकाज पाहिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.