सलग तिस-या दिवशी पुण्यात बीए व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असतानाच राज्यातही आता बीए व्हेरिएंटचा पुन्हा फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पुण्यासह मुंबई, ठाणे, बुलडाणा आणि लातूरमध्येही बीए विषाणूचा फैलाव झाल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. २९ जून ते ४ जुलैदरम्यान राज्यात कोरोनाची बाधा झालेल्या ३९ रुग्णांध्ये बीए व्हेरिएंट आढळला.
( हेही वाचा : ‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे)
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालातून राज्यात बीए व्हेरिएंटचे २६ तर बीए २.७५ चे १३ रुग्ण आढळले. यातील २३ रुग्ण मुंबई तर १३ रुग्ण पुण्यातील आहेत. ठाणे, बुलडाणा आणि लातूर येथेही प्रत्येकी एका रुग्णाला बीए व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समोर आले. यामुळे राज्यातील आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या १५८ तर बीए २.७५ रुग्णांची संख्या ७० वर आली आहे.
जिल्हानिहाय बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या –
पुणे – ९१, मुंबई – ५१, ठाणे – ५, नागपूर, पालघर – प्रत्येकी ४, रायगड – ३
जिल्हानिहाय बीए २.७५
पुणे – ४३, नागपूर – १४, मुंबई – ५, अकोला – ४, ठाणे, यवतमाळ, बुलडाणा, लातूर – प्रत्येकी १
डिस्चार्ज रुग्णांची संख्या वाढली
सोमवारी राज्यात १ हजार १११ नव्या कोरोनाच्या रुग्णांसह अगोदरपासून कोरोनावर उपचार घेणा-या १ हजार ४७४ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. राज्यात सोमवारी सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यात आता १५ हजार १६२ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
Join Our WhatsApp Community