मंत्रालयात वेगवेगळ्या कामासाठी राज्यभरातून लोक येत असतात. त्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे यापुढे मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाता येणार नाही. मंत्रालयात पाण्याच्या बाटलीवर बंदी घातल्याचा आदेशही सरकारकडून जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, म्हणाले “14 खासदारच नव्हे तर”…)
आत्महत्यांची धास्ती
अनेकदा मंत्रालयात आत्महत्येचेही प्रयत्न झाले आहेत. काही जण पाण्याच्या बाटलीतून राॅकेल किंवा किटकनाशक अन्यथा एखादे रसायन घेऊनही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जनता मंत्रालयात येत असते. याआधीही मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाले होते.
Join Our WhatsApp Community