…आणि कदमांना अश्रू अनावर, म्हणाले “50 वर्षात जे उभारलं ते पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळलं”

175

शिवसेना पक्षासाठी गेल्या 50 वर्षात आपले योगदान राहिलेले आहे. पक्ष संघटनेपासून सर्व कामे केली आहेत. शिवसेना पक्ष उभरणीसाठी दिलेले योगदान आणि आताची झालेली अवस्था ही पाहवत नसल्याचे रामदास कदम यांनी स्पष्टपणे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून कदम हे ओळखले जातात. बाळासाहेबांनीच शिवसेना नेतेपदी त्यांची नियुक्तीही केली होती, मात्र त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत ते समाधानी नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा- शिंदे गटाकडून शिवसेनेला धक्का, वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी)

पुढे बोलताना ते असेही म्हणाले, महिन्याभरात शिवसेना पक्षाची जी अवस्था झाली आहे, ती आता पाहवत नाही. जे 50 वर्षामध्ये उभारले ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळताना दिसत आहे. त्यामुळे रात्र-रात्र झोपही येत नाही. पक्षाची झालेली सध्याची अवस्था सांगताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.

माझ्या उतरत्या वयाकडे जात असताना पक्षाच्या वाटेला असे येईल, याचे कधी स्वप्नही पाहिले नव्हते. पण आता ते प्रत्यक्षात पहावे लागत आहे. पदाचा राजीनामा देत असलो तरी आनंदी आणि समाधानी अजिबात नाही, पण अशी वेळ का यावी, याचा एकदा तरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी विचार करणं आवश्यक आहे. ज्या पक्षासाठी आपण 52 वर्ष योगदान दिले. त्या पक्षातून हकालपट्टी करणं हे शोभत नाही. सगळं उभं करुन अशी हकालपट्टी होत असेल तर हे खूप वेदनादायी आहे. हे केवळ महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळे ही परस्थिती ओढावली असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.