रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर, प्रथमच रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारांनी संधी पाहून शिवसेना फोडल्याचा आरोप रामदास कमद यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतं
पुढे बोलताना रामदास कदम यांनी म्हटले आहे की, माझ वय आज सत्तर वर्ष आहे. मी गेली 52 वर्षे शिवसेनेत आहे. शिवसेना वाढवण्यासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलन प्रकरणात माझ्यावर अनेक गुन्हे आहेत. मात्र तरीदेखील आदित्य ठाकरे माझ्या कॅबीनमध्ये येऊन मला बैठका घेण्याचे आदेश देतात. या वयात आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावे लागते, याची खंत वाटत असल्याचे, कदम यांनी म्हटले आहे. मात्र, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणल्याशिवाय शांत बसणार नाही, अखेर पर्यंत माझ्या हाताला भगवाच असेल, असंदेखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
( हेही वाचा: “शिंदे-ठाकरेंना मी एकत्र आणणार, शेवटपर्यंत हाती भगवाच धरणार” हकालपट्टीनंतर रामदास कदम भावनिक )
अजून किती जणांची हकालपट्टी करणार
शरद पवार आणि अजित पवार यांनी शिवसेना फोडली. आम्ही सांगत होतो मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माझे म्हणणे ऐकले नाही. पवारांनी बरोबर डाव साधून शिवसेना फोडली, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. तसेच, शिवसेनेतून आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Join Our WhatsApp Community