नुपूर शर्मांना मारण्याचा कट बीएसएफने उधळला, पाकिस्तानातून आलेल्या घुसखोराला अटक

160

गेल्या काही दिवसांपासून आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची चर्चा आहे. प्रेषित पैगंबरांबाबत केलेल्या विधानामुळे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे शर्मा यांना ठार मारण्यासाठी पाकिस्तानातून एक घुसखोर भारतात आला होता. पण बीएसएफकडून या 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. रिझवान अशरफ असे या घुसखोराचे नाव असून, त्याने नूपूर शर्मांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे.

सीमा सुरक्षा जवानांकडून अटक

सीमा सुरक्षा(BSF) दलाच्या जवानांनी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ 24 वर्षीय पाकिस्तानी नागरिकाला पकडले आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील मंडी बहा बीन इथे राहणा-या अशरफचा भारतामध्ये येण्याचा हेतू बीएसएफच्या चौकशीत समोर आला आहे. नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे अशरफ दुखावला होता. त्यामुळे नुपूर शर्मा यांना धडा शिकवण्यासाठी तो भारतात आला होता.

(हेही वाचाः नुपूर शर्मांना जीवे मारण्याची धमकी, सर्वोच्च न्यायालयात धाव)

भारतात आल्यानंतर अशरफला अजमेर दर्ग्याला भेट द्यायची होती. तिथे चादर अर्पण करुन त्याने नुपूर शर्मा यांना मारल्याचा कट रचल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्याच्याकडे कोणतेही शस्त्र सापडले नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

शर्मांच्या याचिकेवर 10 ऑगस्टला सुनावणी

दरम्यान नुपूर शर्मा यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीत पुढील सुनावणीपर्यंत शर्मा यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शर्मा यांच्या याचिकेवर 10 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.