मुंबईच्या मेट्रोला, आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांमुळे मुंबईची मेट्रो रखडली आहे. आता या विरोधकांनी आरे कारशेड म्हणजेच 60 हजार कोटींचा घोटाळा असा आरोप केला आहे, हे एक स्टंटच आहे. मेट्रो थांबवावी कारशेडचे काम होऊ न देणे म्हणजेच मुंबईच्या विकासाची वाट लावणे असा हेतू आहे का, अशी मुंबईकरांना शंका येत आहे. आरे कारशेडची जागा फक्त आणि फक्त मेट्रो कारशेड साठीच वापरावी, असा फडणवीस सरकारचा निर्णय होता. आरे कारशेडसाठी फक्त 30 हेक्टर जागा लागणार, आता कोणतेही झाड कापले जाणार नाही आणि 2 वर्षांच्या आत कुलाबा मेट्रो सीप्झ धावणार अशी खात्री शिंदे-फडणवीस सरकारने दिली आहे. मेट्रोला रुळावरून खाली आणणाऱ्या लोकांनी आता 60 हजार कोटींचा घोटाळा हा एक बोगस आरोप केला आहे. मेट्रो व मुंबईचा विकास थांबवावा हाच त्यांचा हेतू दिसतोय असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे रिक्षा-टॅक्सी वाल्यांसाठी लवकरच महामंडळ स्थापन करणार)
1. रुपये 60 हजार कोटींच्या घोटाळ्याचे 60 रुपयांचे ही पुरावे हे स्वतःला पर्यावरणवादी म्हणणाऱ्या लोकांनी दिले नाही.
2. 60 हजार कोटींचा आकडा आला कुठून.
3. आरे मध्ये कारशेड बांधण्याचा निर्णय हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने दि. 3 मार्च 2014 रोजी घेतला होता. आरे ची 30 हेक्टर जागा त्यासाठी वापरण्याचा निर्णय पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने घेतला होता.
4. या योजेनेला मनमोहन सिंग सरकारने दि. 27 जून 2013 रोजी केंद्रीय मंत्री मंडळात मान्यता दिली होती.
5. या 30 हेक्टर पैकी 3 हेक्टर जागेचे व्यावसायिक वापर करावे असाही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारने निर्णय घेतला होता.
हा निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दि. 9 नोव्हेंबर 2017 रोजी या जागेचा वापर फक्त मेट्रो कारशेडसाठी करावा, यातली कोणतीही जागा किंवा 3 हेक्टर जागा व्यावसायिक वापरासाठी करायची नाही, त्या 3 हेक्टर जागेचा व्यावसायिक वापर करून काही कोटी रुपये मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध करून देण्याचा पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय हा फडणवीस सरकारने रद्द केला होता.
Join Our WhatsApp Community