मंगळवारी सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबईत दोन, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा या चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी कोरोना उपचारांतून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्क्यांवर नोंदवले गेले.
( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या तक्रारी दूर होणार? )
कोरोना रुग्णांची संख्या घटली
राज्यात २ हजार २७९ नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीसह गेल्या २४ तासांत २ हजार ६४६ कोरोनाबाधितांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. परिणामी, राज्यात आता १४ हजार ७८९ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार केले जात आहेत. येत्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या घटण्याचे प्रमाण कायम राहील, असा अंदाज आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केला.
जिल्हानिहाय सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या
- पुणे – ५ हजार ४१३
- मुंबई – २ हजार ९३
- ठाणे – १ हजार १४१
- नागपूर – १ हजार २५५
- नाशिक – ६०७
- अहमदनगर – ४२१
- रायगड – ४१७
- औरंगाबाद – ३३३
- सोलापूर- ३०२