एकनाथ शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या १२ खासदारांकडून आता शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. अशाच प्रकारे हिंगोलीतील खासदार हेमंत पाटील यांनीही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर पैसे उकळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
संतोष बांगरकडून सोन्याची चेन घेतली
विनायक राऊत यांच्या संदर्भात आमच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळेच आम्हाला लोकसभेत नवा गटनेता हवा होता. विनायक राऊतांनी कशापद्धतीने संघटनेत पदे देत असताना आणि उमेदवारी देताना पैसे उकळले याची पुराव्यासहीत माझ्याकडे माहिती आहे, असा खळबळजनक दावा हिंगोली मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. विनायक राऊत यांनी कशापद्धतीने पक्षसंघटनेत पदे देत असताना आणि उमेदवारी वाटताना पैसे उकळलेले आहेत याची पुराव्यासहीत माहिती माझ्याकडे आहेत. आम्ही खासदार तर आहोतच पण मतदारांशी देखील आम्ही बांधील आहोत. मागच्या तीन वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचे काम माझ्या मतदार संघात झालेले नाही, असेही खासदार पाटील म्हणाले. स्वत:च्या वाढदिवसाच्या जेवणावळीसाठी विनायक राऊतांनी संतोष बांगर यांच्याकडून पैसे घेतले. संतोष बांगरकडून सोन्याची चेन घेतली. अशा अनेक पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी पैसे घेतले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांकडून त्यांनी पैसे उकळले आहेत, असा आरोप हेमंत पाटील यांनी केला आहे.
(हेही वाचा २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा हे खासदार का गप्प होते? – संजय राऊतांचा सवाल)
विनायक राऊत माणूस आहे का डाकू – नितेश राणे
या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. त्यावेळी राणे यांनी, निवडणुक तिकीटाला पैसे, स्वतःच्या निवडणुकीला पैसे, प्रवासाचे पैसे, हॉटेल व जेवणाचे पैसे, पैसे नाही तर सोन्याची चैन ढापली, विनायक राऊत माणूस आहे की डाकू, दरोडेखोर लाजेल हे बघून. पैशासाठी हा उद्धव, आदित्यला पण भंगारात विकेल, अशा शब्दांत टीका केली.
Join Our WhatsApp Communityनिवडणुक तिकीटाला पैसे,
स्वतःच्या निवडणुकीला पैसे,
प्रवासाचे पैसे,
हॉटेल व जेवणाचे पैसे,
पैसे नाही तर सोन्याची चैन ढापली,विनायक राऊत माणूस आहे की डाकू, दरोडेखोर लाजेल हे बघून. पैशासाठी हा उद्धव, आदित्यला पण भंगारात विकेल. pic.twitter.com/Gu95bfd9Gu
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 19, 2022