मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे. ‘एक संजय तुरुंगात गेला, दुसरा लवकरच…’, अशा आशयाचे ट्विट कंबोज यांनी केले आहे.
(हेही वाचा – शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, केंद्रीय निवडणूक आयोगाला शिंदे गटाचं पत्र)
काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप त्यावेळी कंबोज यांनी केला होता. येत्या काळात एका मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडेल, असा दावाही त्यांनी केला होता. आता संजय पांडे यांना ईडीने अटक केल्यानंतर, ‘एक संजय तुरुंगात गेला, दुसरा लवकरच…’ असे ट्विट करीत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पाठविलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर कंबोज यांचे ट्विट चर्चेत आले आहे.
एक Sanjay गया दूसरा जल्द …….
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) July 19, 2022
संजय राऊत यांना समन्स
संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयाने गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी बुधवारी चौकशीसाठी समन्स पाठवले. मंगळवारी ईडीने राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणात सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक मित्र आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या नावाने राऊत यांनी अलिबागमधील जमिनीची खरेदी केली असून, त्यातील ४ प्लॉट स्वप्ना पाटकर यांच्या, तर ४ प्लॉट वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी केल्याचा आरोप आहे.
Join Our WhatsApp Community