शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने केलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून, या प्रकरणाचा निर्णय आता 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे.
त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तराचे भिजत पडलेले घोंगडे अजून किती काळ भिजत राहणार असा प्रश्न निर्माण होत असतानाच आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः ‘बंद दाराआड झालेली संपूर्ण चर्चा अमित शहांनी सांगितली’, केंद्रीय मंत्र्याचा मोठा खुलासा)
लवकरच होणार निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीबाबत आम्ही समाधानी आहोत. आमची बाजू भक्कम असून आम्हाला न्यायालयात नक्कीच न्याय मिळेल. त्यामुळे आता तरी याबाबत बोलणं योग्य होणार नाही. पण न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. पण राष्ट्रपतींची निवडणूक असल्यामुळे हा विस्तार थांबला होता. पण आता लवकरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका
सर्वोच्च न्यायालयाने सध्याची परिस्थिती ही जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अपात्रतेच्या नोटीसबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे काही लोक याबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले आहे.
(हेही वाचाः राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार)
Join Our WhatsApp Community