Internet चे आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या गुगलवर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मागील 25 दिवसांत दोन वेळा शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला.
महाविकास आघाडी सरकारने पायउतार होताना, औरंगाबादच्या नामांतराचा घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आणि नविन प्रस्ताव आणत तो मंजूर केला. केंद्र शासनाने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला मंजुरी दिली नसली, तरी गुगल सर्च इंजिनसह मॅपवर संभाजीनगर असे नाव दिसते आहे.
क्रोमा ने घेतली सरकारच्या निर्णयाची दखल
सरकारच्या निर्णयाची दखल क्रोमा या कंपनीने घेत त्यांच्या लोकेशनवर संभाजीनगर केले आहे. तर शहरातील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनीदेखील संभाजीनगर असे लिहिण्यास सुरुवात केली आहे.
( हेही वाचा: OBC Reservation: 27 टक्के आरक्षणासह निवडणुका होणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय )
या कंपनीच्या पत्त्यावरही नाव बदलले
क्रोमा ही टाटा समूहाची उपकंपनी आहे. या कंपनीच्या लोकेशनमध्ये आता औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर असे लिहून येत आहे, क्रोमा ब्राऊझरच्या पोर्टलवर गेल्यावर लोकेशनसाठी 431001 ते 10 पर्यंत पिन कोड टाकल्यावर संभाजीनगर दिसून येत आहे.