मुंबईच्या पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांना बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, सध्या पावसाळी अधिवेशनासाठी संजय राऊत दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज, बुधवारी चौकशीला गैरहजर होते. दरम्यान, या प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी राऊतांनी ईडीकडे 7 ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्याची विनंती केली होती. दरम्यान, संजय राऊतांनी मागितलेली 7 ऑगस्टपर्यंतची वेळ ईडीने मान्य केली आहे.
…म्हणून मागितला वाढवून वेळ
संजय राऊत यांना ईडी कार्यालयात दाखल होण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आल्याची माहिती वकील विक्रांत सबणी यांनी दिली आहे. राऊतांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी ईडी कार्यालयात दाखल होण्याचे आदेश होते. परंतु राऊत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात असल्याने त्यांनी ईडीकडून वेळ मागून घेतला आहे.
(हेही वाचा – कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं)
#UPDATE | ED has granted us time till 7th August as we sought the same. Sanjay Raut will appear on the next date, said Shiv Sena leader Sanjay Raut's lawyer Vikrant Sabne
— ANI (@ANI) July 20, 2022
यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. यापूर्वी याच प्रकरणात प्रवीण राऊत यांची यापूर्वी ईडीसमोर चौकशी झाली आहे. प्रवीण राऊत हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे.
Join Our WhatsApp Community