संसदेच्या अधिवेशनात एक धक्कादायक माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 3.92 लाख भारतीय नागरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडले असल्याचे लोकसभेत सांगण्यात आले आहे. यामध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारणा-या नागरिकांची संख्या सर्वाधिक असून, 48 जणांनी तर चक्क पाकिस्तानचं नागरिकत्व स्विकारलं असल्याचे सांगण्यात येत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची आकडेवारी
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. 2019,2020,2021 या तीन वर्षांत खासगी कारणांसाठी तब्बल 3 लाख 92 हजार 643 लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. ज्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले त्यांनी जगातील वेगवेगळ्या 120 देशांचे नागरिकत्व स्विकारले असून, यामध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारणा-या लोकांची संख्या ही सर्वाधिक आहे, असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः ‘बंद दाराआड झालेली संपूर्ण चर्चा अमित शहांनी सांगितली’, केंद्रीय मंत्र्याचा मोठा खुलासा)
किती आणि कोणत्या देशांचे नागरिकत्व
- अमेरिका- 1 लाख 70 हजार 795
- कॅनडा- 64 हजार 71
- ऑस्ट्रेलिया- 58 हजार 391
- यूके- 35 हजार 435
- इटली- 12 हजार 131
- न्यूझीलंड- 8 हजार 832
- सिंगापूर- 7 हजार 46
- जर्मनी- 6 हजार 690
- स्वीडन- 3 हजार 754
- पाकिस्तान- 48
(हेही वाचाः सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ पदार्थांवर लागणार नाही जीएसटी)
2021 या एका वर्षात 1 लाख 63 हजार 370 लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं असून, यामध्ये सर्वाधिक 78 हजार 284 जणांनी अमेरिकेचं तर 23 हजार 533 जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्विकारल्याचे सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community