राज्यात बुधवारी ७ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मुंबई, उल्हासनगर, पुणे शहर व ग्रामीण भागांत आणि रत्नागिरीत प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. साता-यातही दोन कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावले. कोरोनाचे रुग्ण घटत असताना वाढत्या मृत्यूंमुळे आरोग्य विभागासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड)
राज्यात बुधवारी २ हजार ३२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांमधील नोंदीनुसार, २ हजार ४७१ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्क्यांवर कायम आहे तर मृत्यूदर १.८४ टक्क्यांवर नोंदवण्यात आला.
पुण्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट
राज्यात सध्या १४ हजार ६३६ कोरोना रुग्णांवर विविध भागांत उपचार सुरु आहेत. बीए व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात आता सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. बुधवारी पुण्यात केवळ ५ हजार ३०५ कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. हा आकडा येत्या तीन-चार दिवसांत अजून खाली जाण्याची शक्यता आरोग्य विभागातील अधिका-यांनी व्यक्त केली. पुण्याखालोखाल मुंबईत २ हजार ३, ठाण्यात १ हजार ५५ तर नागपूरात १ हजार २९७ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत.
Join Our WhatsApp Community