MSRTC एसटी महामंडळाने भारतीय स्टेट बॅंक व स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बॅंकांशिवाय कर्माचा-यांना फेडरल बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेसारख्या खासगी बॅंकेमध्ये वेतन खाते उघडण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आधीच उतरती कळा लागलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बॅंक आणखी अडचणीत येणार आहे.
एसटी कर्मचा-यांचे बहुतांश व्यवहार State Transport Co- operative बॅंकेतून चालतात. पूर्वी एसटी कर्मचारी, अधिका-यांना भारतीय स्टेट बॅंक व स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेमध्ये पगार खाते उघडणे बंधनकारक होते. मात्र आता एसटी महामंडळाने कर्मचा-यांना पगार खाते उघडण्यास सूट दिली आहे.
( हेही वाचा: Android वापरकर्ते सावधान! तातडीने डिलीट करा हे 8 डेंजर अॅप्स )
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेने कर्जाचे व्याजदर कमी न केल्यामुळे एसटी कर्मचा-यांमध्ये नाराजी होती. इतर बॅंकांच्या स्पर्धेत उतरुन या बॅंकेने व्याजदर ठेवायला हवा होता. आता इतर बॅंकेत वेतन खाते उघडण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने कर्मचारी त्यांचे वेतन इतर बॅंकेतून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही – महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे
कर्ज घेतले असल्यास ना हरकत आवश्यक
ज्या एसटी कर्मचा-यांनी भारतीय स्टेट बॅंक व स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बॅंकेमधून कर्ज घेतले आहे. त्यांना इतर बॅंकेत वेतन खाते उघडण्यापूर्वी संबंधित बॅंकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागणार आहे. तसेच ज्या कर्मचा-यांचे इतर बॅंकेत बचत खाते आहे, त्यांना तेच खाते वेतन खात्यात बदलता येऊ शकते.
Join Our WhatsApp Community