भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार, २३ जुलै रोजी पनवेल येथे होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीत राजकीय प्रस्ताव मांडतील. ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळवल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे भाजपा–शिवसेना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील. शेतीविषयक प्रस्ताव भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे मांडतील. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत राजकीय सद्यस्थितीविषयी चर्चा होईल. तसेच आगामी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
( हेही वाचा: संजय राऊत 007; हे कोणाचे सीक्रेट एजेंट आहेत? )
८०० प्रतिनिधींची उपस्थिती
या बैठकीला भाजपा प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष, विविध मोर्चा – आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य असे सुमारे ८०० प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community