देशातील ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयांना मुबलक आणि खंडित वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचा विचार केंद्र सरकारचा आहे, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री भगवंत खुबा यांनी लोकसभेत दिली.
शैक्षणिक संस्थांना अखंडित वीज पुरवठा
भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री खुबा बोलत होते. सध्या देशात आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोतावरून पारंपरिक ऊर्जा स्रोताकडे वळत आहोत. अशा प्रकारे केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या इमारतींना सौर ऊर्जाद्वारे वीज पुरवठा केला जात आहे. अशा प्रकारे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या इमारतींना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात यावा, कारण जरी शहरी भागात शाळा-महाविद्यालयांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे ऊर्जा पुरवठा केला जातो, मात्र ग्रामीण भागात वीज अखंडितपणे पुरवता येत नाही. त्यामुळे आता या संस्थांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यात यावा, याकरता विशेष प्रकल्प हाती घेण्यात यावा, अशी मागणी खासदार महाजन यांनी केली. त्यावेळी मंत्री भगवंत खुबा यांनी याविषयी शिक्षण विभागाला सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
(हेही वाचा एकनाथ शिंदेंचे पुढील लक्ष्य, शिवसेना प्रतिनिधी सभेतील १८८ सदस्य?)
Join Our WhatsApp Community