तो डोंगर, ती झाडी, तेच आरे… मेट्रो कारशेड Ok होणार हाय!

166

मुंबई आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उठवण्यात आली असल्याने आरेतील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मेट्रोचं कारशेड हे आता आरेमध्येच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

(हेही वाचा – National Herald Case: सोनिया गांधींची ३ तासानंतर ED चौकशी संपली)

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे गेल्या अडीच वर्षापासून कारशेडचे काम बंद होते. मात्र आता ही स्थगिती उठवल्याने आरे कारशेडचं काम लवकरच सुरू होणार आहे. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत सरकारच्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस म्हणाले, पर्यावरणप्रेमी संस्थांनी आंदोलन केलं, ते उच्च न्यायालयात गेले, त्यानंतर एनजीटीने यांच्या विरोधात निर्णय दिला. नंतर हे सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे की, आरे कारशेडमधील आपण जेवढी झाडं कापली ती त्यांच्या संपुर्ण आयुष्यात जेवढे कार्बन सिक्वेटेशन करतील तेवढं ही मेट्रो ८० दिवसांत करणार आहे.

काय म्हणाले फडणवीस

मुंबईतील लोकांसाठी मेट्रोचे महत्व सांगताना फडणवीस म्हणाले, मेट्रोमुळे आपण जवळपास दोन लाख मेट्रीक टन एवढं कार्बन उत्सर्जन थांबवणार आहोत. इतकेच नाही तर मेट्रोला एक-एक दिवस उशीर करणं म्हणजे, प्रदुषणाच्या माध्यमातून मुंबईकरांचे आयुष्य कमी करणे आहे. या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काम सुरू करण्यात आले होते, तेव्हा कोणतेही आंदोलन करण्यात आले नव्हते. काम २५ टक्के पुर्ण झाल्यानंतर ते बंद करण्यात आले आहे.

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर

फडणवीस म्हणाले की, आम्ही पर्यावरणप्रेमींच्या भावनाचा आदर करतो, त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ते काम थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामागे त्यांचा सदहेतू आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. २५ टक्के काम झालं आहे शिल्लक काम वेगाने पूर्ण झालं तर रोज लोकलच्या गर्दीमध्ये गुदमरणाऱ्या मुंबईकरांची या त्रासातून सुटका होईल. त्यांच्यासाठी ही ४० किलोमीटरची मेट्रो लाईफलाईन ठरणार आहे, त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.