मुंबईकरांनो, असे आहे ११ मेट्रो प्रकल्पांचे Status, कोणती मेट्रो कधी होणार सुरु?

173

मुंबईकरांसाठी लोकल सेवा ही लाईफलाईन समजली जाते. एखाद्या तासाकरता जरी मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली, तरी मुंबईचा खोळंबा होतो. हे वर्षानुवर्षे सुरु आहे. मुंबईकरांची या समस्येपासून सुटका करायची असेल, तर मुंबईत पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, म्हणून मग मेट्रो प्रकल्पांची उभारणी सुरु झाली. मुंबई-महामुंबईत सध्या मेट्रोचे एकूण ११ प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांची सध्याची काय स्थिती आहे, हे जाणून घेऊया.

  • २ए  – दहिसर-डी.एन नगर (१८.६ किमी) –  हा प्रकल्प २०१६मध्ये सुरु झाला असून या प्रकल्पाची किंमत ६ हजार ४१० कोटी रुपयांची आहे. त्यापैकी ३ हजार ८१६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प मार्च २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. या प्रकल्पासाठी स्थापत्य आणि प्रणालीची कामे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) मार्फत अंतिम टप्प्यात आहेत.
  • २बी – डी.एन नगर – मंडाळे (२३.६ किमी) – हा प्रकल्प २०१८ साली सुरु झाला. या प्रकल्पाची किंमत १० हजार ९८६ कोटी रुपये आहे. त्यातील केवळ १ हजार ५६५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प जून २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.
  • कुलाबा – वांद्रे – सीप्झ  (३३.५ किमी) – हा प्रकल्प २०१६ साली सुरु झाला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३३ हजार ४०६ कोटी रुपये इतका आहे. आतापर्यंत १९ हजार ९६७ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा प्रकल्प २०२२-२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

(हेही वाचा सणांवरील निर्बंधांची हंडी फुटली! फुकटात बांधा मंडप, दणक्यात साजरा करा उत्सव)

  • वडाळा -घाटकोपर-ठाणे – कासारवडवली (३२ किमी) – या प्रकल्पाची सुरुवात २०१८ साली सुरुवात झाली. त्यासाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये प्रस्तावित होते, त्यातील १ हजार ३२९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा प्रकल्प फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. याची ३३.८ टक्के स्थापत्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
  • वडाळा – घाटकोपर-ठाणे – कासारवडवली – गायमुख (२.७ किमी) – हा प्रकल्प २०१९ मध्ये सुरु झाला आहे, त्याकरता ९४९ कोटी खर्च प्रस्तावित आहे. त्यातील १२२ कोटी खर्च झाले आहेत. हा प्रकल्प फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. यातील २४ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.
  • ठाणे – भिवंडी – कल्याण (२३.५ किमी) – हा प्रकल्प २०१९ मध्ये सुरु झाला असून त्याचा ८ हजार ४१७ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे, त्यापैकी ४४२ कोटी खर्च झाले आहेत. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाची स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.
  • स्वामी समर्थ नगर – विक्रोळी (१४.५) – हा प्रकल्प २०१८ साली सुरु झाला. त्यासाठी ६ हजार ७१६ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. त्यापैकी १ हजर ६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. ४०. टक्के स्थापत्य काणे डीएमआरसी मार्फत पूर्ण झाली आहेत.

(हेही वाचा एकनाथ शिंदेंचे पुढील लक्ष्य, शिवसेना प्रतिनिधी सभेतील १८८ सदस्य?)

  • अंधेरी (पू.) – दहिसर (पू.) (१६.५ किमी) – हा प्रकल्प २०१६ साली सुरु झाला असून त्यासाठी ६ हजार २०८ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहेत. त्यातील ३ हजार १७ कोटी रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्प मार्च २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, पण अद्याप प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पासाठी स्थापत्य कामे अंतिम टप्प्यात आहेत.
  • दहिसर (पू.) ते मीरा भाईंदर आणि अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (१३.५ किमी) – या प्रकल्पाला २०१९ साली सुरुवात झाली. त्यासाठी ६ हजर ६०७ कोटी रुपये प्रस्तावित होते. मात्र त्यातील केवळ ५८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी २३.२ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.
  • गायमुख – शिवाजी चौक (मीरा रोड) – हा प्रकल्प सुरूच झाला नाही, या प्रकल्पाला ४ हजार ४७६ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. यापैकी केवळ ८३ लाख रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
  • सीबीडी बेलापूर ते पेंधर (११.१०किमी) – हा प्रकल्प ३ हजार ६३ कोटी रुपयांचा आहे. त्यातील २ हजार २७९ कोटी रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप हा प्रकल्प सुरु झाला नाही.

(हेही वाचा नर्मदा नदीतील अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एसटी महामंडळाची नवी नियमावली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.