मोबाईल फोनच्या बदल्यात काचेचे तुकडे तसेच जुने मोबाईल फोन पाठवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन शॉपिंग कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेने या कंपनीच्या मालकासह दोघांना अटक करून कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
काय आहे घटना?
राहील जयतीलाल रांका (२५) आणि सिद्धेश सुतार (२४) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून राहील रांका हा कंपनीचा मालक असून सिद्धेश हा कंपनीचा टीम लीडर म्हणून काम करीत होता. राहिला रांका हा मालाड पश्चिम लिबर्टी गार्डन येथे राहणारा असून त्याने सोशल मीडियावर ‘चंदा एंटरप्राइज’ नावाची ऑनलाइन मोबाईल फोन विक्रीची कंपनी थाटली होती. या कंपनीत त्यांने मोठ्या प्रमाणात कामावर मुली आणि मुलांना ठेवले होते.मालाडच्या काचपाडा येथील निओ कॉर्पोरेट प्लाझा या इमारतीत राहिला इम्पेक्स नावाने कार्यालय थाटले होते.
(हेही वाचा – SC चा ‘सर्वोच्च’ निर्णय; अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी)
राहील रांका याने सोशल मीडियाचा आधार घेऊन (फेसबुक, इन्स्टाग्राम) नवीन ब्रँडेड मोबाईल फोन स्वस्त दरात विक्री करीत असल्याची जाहिरात करून ऑनलाइन ऑर्डर घेऊन ग्राहकांना मोबाईल फोनच्या बॉक्स मध्ये काचेचे तुकडे, बिघडलेले जुने मोबाईल फोन आणि निरुपयोगी वस्तू पॅक करून कुरिअर कंपनीच्या मार्फत पाठवून ग्राहकाची आर्थिक फसवणूक करीत होते.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ च्या पथकाला या कंपनीची माहिती मिळाली असता गुरुवारी या कंपनीवर पोलिसांनी छापा टाकून राहिला रांका याला अटक करून वेगवेगळ्या कंपनीचे ३ हजार १९९ मोबाईल एकूण किंमत १कोटी ३७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन तसेच कार्यालयतील संगणक, व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community