भारताच्या विरोधात अपप्रचार करणारी ७४७ संकेतस्थळे बंद

147

देशहित विरोधी काम करणाऱ्या यू ट्यूब वाहिन्या व संकेतस्थळांविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, 2021-22 मध्ये कठोर कारवाई केली आहे. अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 21 जुलैला राज्यसभेत दिली. राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की 94 यू ट्यूब वाहिन्या, 19 समाज माध्यम खाती आणि 747 यूआरएल अर्थात संकेतस्थळे यांच्याविरुध्द कारवाई करत बंद करण्यात आली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील विभाग 69 अ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

( हेही वाचा : भगवती रुग्णालयात भंगारात टाकल्या नवीन व्हिल चेअर्स, स्ट्रेचर्स; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल)

कठोर कारवाई

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, इंटरनेटवर खोट्या बातम्या पसरवून तसेच अपप्रचाराचा प्रसार करून देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा येईल अशी कामे करणाऱ्या संस्थांविरुद्ध केंद्र सरकारने कठोरपणे पावले उचलली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.