मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे, आता राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याकडे हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे शुक्रवारी, २२ जुलै रोजी दिल्लीला रवाना होणार आहेत.
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सूरु आहे, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकार हे नियमबाह्य आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही, असे राऊत म्हणाले आहे. असे असतानाही शिंदे गट आणि भाजपा सरकार हे मंत्रीमंडळ विस्तार करणार आहे. मागील आठवड्यातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी मुख्यमंत्री शिंदे यांची दिल्लीत चर्चा झाली होती, आता राष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर शुक्रवारी, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही दिल्लीत जाणार आहेत. त्यानुसार शिंदे गट आणि भाजपा हे दोन्ही बाजूने किती मंत्री पदे विभागून घेणार यावर निर्णय होणार आहे.
(हेही वाचा मुंबईकरांनो, असे आहे ११ मेट्रो प्रकल्पांचे Status, कोणती मेट्रो कधी होणार सुरु? )
Join Our WhatsApp Community