आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही करणार महाराष्ट्र दौरा; नियोजन सुरु

163

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढली. त्यानंतर आता शिवसंवाद यात्रा सुरु केली. या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे काही जिल्ह्यांच्या दौ-यावर आहेत. आता दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील राज्याच्या दौ-यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरु असल्याची, माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संजय राऊतांनी दिली माहिती 

संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या दौ-याची सुरुवात झाली. ठाण्यात त्यांचे उत्साहात स्वागत झाले. आदित्य यांच्या दौ-याला तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, स्थानिक शिवसैनिक शिवसेनेसोबत असल्याचे, त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील वातावरण शिवसेनामय होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या दौ-यावर जाणार असून, त्याचे नियोजन सुरु झाले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

( हेही वाचा: आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, मी लगेच राजीनामा देतो; सुहास कांदेंचे आव्हान )

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरु

देशासमोर उभे असलेले प्रश्न आम्ही विचारत असल्याने, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेकांना ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. देश हितासाठी बोलत असल्याने, सर्वांवर कारवाई सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्या दबावात काम करत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचे, राऊत यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.