अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना संसर्ग झाला असून या संदर्भात व्हाइट हाऊसने प्रसिद्धीपत्रक जारी करून याची माहिती दिली आहे. जो बायडन यांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत आणि ते विलगीकरणात राहून काम सुरू ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर बायडन आता झूम कॉलच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बायडन हे सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष असून त्यांचे वय ७९ वर्षे आहे. दरम्यान कोरोना बाधित आढळल्यानंतर बायडन यांना सर्दी, थकवा येणे आणि कोरडा खोकला अशा समस्या जाणवत आहेत, अशी माहिती व्हाइट हाउसचे डॉ. केविन ओ कॉनर यांनी दिली. त्यांच्यावर अँटीव्हायरल पॅक्सलोविड उपचार केले जात आहेत.
लसीचे दोन्ही डोस घेतले असून कोरोना
व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी माध्यम सचिव कॅरिन जीन पियरे यांनी सांगितले की, जो बायडन यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून देखील त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांना कोरोना संसर्गाची सौम्य लक्षण जाणवत आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बायडन हे सध्या व्हाईट हाऊसमध्ये स्वतः विलगीकरणात आहेत. बायडन यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Indian Currency: नोटांवर का असतात ‘या’ तिरक्या रेषा? तुम्हाला माहितीये का? वाचा…)
बायडन यांचे सचिव करिन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष विलगीकरणामध्ये असले तरी ते आपली सर्व कामे करणार आहेत. त्यांनी फायजरचे दोन डोस घेतले आहेत. त्याशिवाय त्यांनी सप्टेंबर महिन्यात पहिला बूस्टर डोस आणि ३० मार्चला अतिरिक्त डोस घेतला होता.
मोदींच्या बायडन यांना शुभेच्छा
जो बायडन यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडन यांना कोविड-१९ मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
My best wishes to @POTUS @JoeBiden for a quick recovery from COVID-19, and prayers for his good health.
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2022
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोविड-१९ मधून लवकर बरे होण्यासाठी बायडन यांना माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना.
Join Our WhatsApp Community