दादर ते अंबरनाथ अमित ठाकरेंनी केला लोकलने प्रवास; पाहा व्हिडीओ

189

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे सध्या सर्वत्र दौरा करत आहेत. शुक्रवारी 22 जुलैला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर दौ-यावर आहेत. त्यांनी या दौ-यासाठी दादर ते अंबरनाथ लोकलने प्रवास केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

( हेही वाचा: ‘एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका’, असा फोन ‘वर्षा’वरून आला होता; सुहास कांदेंचा गंभीर आरोप )

 

अमित ठाकरे यांचा असा आहे दौरा

  • सकाळी 9 वाजता प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ येथे अभिषेक
  • सकाळी 10 वाजता रोटरी क्लब अंबरनाथ पूर्व येथे तरुणांशी संवाद आणि पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा
  • दुपारी 12 वाजता बदलापूर घोरपडे चौक येथे आगमन ( जेवणासाठी राखीव)
  • दुपारी 1 वाजता घोरपडे हाॅल येथे तरुणांशी संवाद
  • संध्याकाळी 5 वाजता उल्हासनगर जवाहर हाॅटेलजवळील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला भेट
  • टाऊन हाॅल येथे तरुणांशी संवाद
  • संध्याकाळी विठ्ठलवाडी स्टेशनहून लोकलने मुंबईकडे रवाना
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.