शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवा, मी स्वतः भाजपसोबत युती करायला तयार असल्याचे सांगितल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. पण हे खोटं असल्याचं उद्धव ठाकरेंच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. पण याची शहानिशा करण्यासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा अनिल परबांचा फोन तपासा, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
ही धक्कादायक गोष्ट
जर आपल्या पक्षातील नंबर दोनच्या नेत्याला जर उद्धव ठाकरेंकडून बाजूला ठेवण्याची भाषा करण्यात येत असेल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाचं काय होईल. एकनाथ शिंदे हे अनेक वर्ष पक्षाचे विधीमंडळ नेते आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एकनाथ शिंदे यांनी कायमंच काळजी घेतली त्यामुळे त्यांच्याबाबत असं बोललं गेलं असेल तर ही धक्कादायक गोष्ट आहे.
(हेही वाचाः ‘एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका’, असा फोन ‘वर्षा’वरून आला होता; सुहास कांदेंचा गंभीर आरोप)
परबांचा फोन तपासा
उद्धव ठाकरेंकडून असा कोणताही फोन करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत असून माध्यमांमध्ये असलेल्या या बातम्या खोट्या असल्याचे सांगण्यात येत आहे. पण हे जर खोटं असेल तर त्याची तपासणी केली पाहिजे. अनिल परब यांचा फोन तपासून बघा त्यावरुन जर फडणवीसांना फोन गेला असेल तर हे नक्कीच घडलं असेल. कारण उद्धव ठाकरेंचे फोन हे त्यांच्या फोनवरुन कधी जात नाहीत तर अनिल परब यांच्या फोनवरुन जातात हे मला माहीत आहे. त्यामुळे अनिल परबांचा फोन तपासला तर हे खरं की खोटं ते कळेल.
Join Our WhatsApp Community