दबंग अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, या भेटीचे काय औचित्य होते याबाबत मात्र गूढ निर्माण झाले आहे. परंतु ही भेट केवळ सदिच्छा भेट होती इतर कुठलेही कारण नसल्याचे एका वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांनी म्हटले आहे.
आयुक्तलयात चर्चेला उधाण
मुसावाला प्रकरणानंतर लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर सलमान आणि त्याचे वडील सलीम खान असल्याचे त्यांना काही महिन्यांपूर्वी आलेल्या धमकीच्या चिठ्ठीतून समोर आले होते. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला असून गुन्हे शाखा कक्ष ९ या प्रकरणाचा तपास करीत आहे. या धमकी प्रकरणानंतर सलमान खान आणि वडील सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.
( हेही वाचा : मुंबईत येत्या शुक्रवारी एससी, एसटी वगळता ओबीसी, सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत )
दरम्यान शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तलयात दाखल झाला होता, त्याने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच सहपोलिस आयुक्त (कावसु) विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली, या भेटीचे नक्की कारण काय याबाबत गूढ निर्माण झाले असले तरी ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असे स्पष्टीकरण वरिष्ट आयपीएस अधिकारी यांनी दिली आहे. सलमान खानने अचानक शुक्रवारी पोलीस आयुक्तलयाला भेट दिल्यामुळे आयुक्तलयात चर्चेला उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community