घरात कोणकोणते प्राणी पाळता येतात, जाणून घ्या…

177

केबीसी मराठी या रिअलिटी शोमध्ये एका तरुणीने पोपट पाळल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. पोपट हा वन्यजीव संवर्धन कायद्यात संरक्षित पक्षी असल्याने त्याला पाळता येत नाही, ही माहिती फारशी जनमानसाला ज्ञात नसल्याने अनवधानाने हा प्रकार घडल्याची माहिती उघडकीस आली. मात्र वनविभागाने पोपट पाळण्यासंबंधी फारशी जनजागृती न केल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. मुंबई विभागात आजही सर्रास पोपट आणि काही संरक्षित प्रजातीची कासवे पाळली जात असल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केला.

प्राणी पाळायची असेल, तर आधी या १९२६ नंबरवर संपर्क करा

घरात कुत्री, मांजर पाळायला वनविभाग आक्षेप घेत नाही. कारण हे दोन्ही प्राणी पाळीव समजले जातात. गाय, म्हैसही पाळण्याबाबत कायद्याने कोणताही आक्षेप घेतला जात नाही. चिमणी किंवा कावळ्याला पाळता येत नाही. परंतु या पक्ष्यांनाही पाळीव समजले जाते. काही परदेशी प्रजातीचे पोपट, कासव यांना घरात पाळायचा विचार असेल तर वनविभाग आडवा येत नाही. कारण वन्यजीव संवर्धन कायद्यात परदेशी प्रजातींचे पक्षी आणि प्राणी यांना संरक्षण दिलेले नाही. मात्र घरात पाळले गेलले प्राणी-पक्षी यांची हेळसांड केली जात असल्याची तक्रार आल्यास मात्र प्राणीहक्क कार्यकर्ते किंवा प्राणीप्रेमी कायद्याच्या विविध तरतुदींतून तुम्हाला चांगलेच अद्दल घडवू शकतात. त्यामुळे घरात प्राणी पाळायचा विचार असेल तर पहिल्यांदा वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर अगोदर कायद्याची माहिती घ्या, तसेच पाळीव प्राण्यांची व्यवस्थित काळजी घ्या.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला डावलण्यासाठी भाजपाला दिलेला युतीचा प्रस्ताव! दीपक केसरकरांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.