शिक्षण भरती घोटाळा प्रकरणात छापेमारी; 20 करोड रुपयांची रोकड ईडीकडून जप्त

142

Teacher Recruitment Scam पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती, तसेच ‘क’आणि ‘ड’ श्रेणीतील कर्मचा-यांच्या भरतीतील घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने जप्त केलेल्या पैशांचा फोटो आपल्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना मारण्याची सुपारी दिली होती; नितेश राणेंचा गंभीर आरोप )

महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही शिक्षक भरती घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने शुक्रवारी एका राजकीय नेत्याच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर तसेच इतर ठिकाणांवर छापे मारले. ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या त्या निकटवर्तीय असल्याचे, सांगतिले जात आहे. ईडीला अर्पिता मुखर्जी यांच्या घरी नोटांचे असंख्य बंडल आढळून आले. ईडी अधिका-यांनी मशीनच्या मदतीने या नोटांची गिनती केली. यावेळी या घरातच तब्बल 20 कोटी रुपये आढळून आले. तसेच, येथून 20 मोबाईलही जप्त करण्यात आले. घटनास्थळी आढळलेल्या नोटांमध्ये दोन हजार आणि पाचशेच्या नोटांचा ढिगाराच लागला होता. अर्पिता यांच्यासंबंधीच्या ठिकाणांवर अजूनही ईडीची कारवाई सुरु असून, या घोटाळ्यात आणखी कोण कोण शामिल आहे, याचा तपास ईडीमार्फत करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.