चंद्रपुरात पुन्हा संततधार, इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

129

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात मागील १२ तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता पुन्हा इरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

( हेही वाचा : प्रवाशांचा खोळंबा! रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक )

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

२२ जुलैच्या रात्रीपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे इरई धरण भरले असून पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी शनिवारी सकाळपासून टप्प्याटप्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता इरई धरणाचे सातही दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आलेले आहेत. त्यात दर एका तासाने पुन्हा ०.५० मीटरने वाढ करण्यात येणार आहे. परिणामी इरई नदी दुथडी भरून वाहत आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर नदीतील पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.