एनसीपी अध्यक्ष शरद पवार हे कायम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करत असतात, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत बोलताना पवारांवर सडकून टीका केली होती. ‘पवार हे जातीवादी असल्यामुळे ते वारंवार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करत असतात’, असे म्हणाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. तरीही शरद पवार यांनी पुन्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुन्हा टीका केली.
श्रीमंत कोकाटे यांची कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले लिखाण आणि व्याख्यानांवर टीका केली. बाबासाहेब पुरंदरेंची भाषण आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर इतर कुणी केलेला नाही, असे माझे मत आहे, असे विधान शरद पवार यांनी केले. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट तर काहींनी धाधांत खोटी माहिती दिली. मात्र श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या इतिहासकारांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, असेही शरद पवार म्हणाले. श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या शिवचरित्र आणि विचार प्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्याला छत्रपती शाहू महाराज तसेच माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील उपस्थित होते.
(हेही वाचा मृतात्म्यांपासून रक्षण होण्यासाठी पोलीस ठाण्यात बळीची प्रथा! पोलीस प्रशासन करणार कारवाई )
Join Our WhatsApp Community