संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! असे आपण लहानपापासूनच ऐकत मोठे झालो आहोत. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक मानला जातो. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात 180 अंडी खाण्याची आवश्यकता असून महिन्यात 15 अंडी पोटात जाणे आवश्यक असल्याचेही सांगितले जाते.
अंडी खाल्ल्याने शरीर निरोगी आणि मजबूत होण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंडी खाल्ल्याने प्रोटीन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यांसारखे अनेक पोषक तत्व शरीरास मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का एका दिवसात किती अंडी खाणं योग्य आहे? जर नसेल माहित तर त्याबद्दल जाणून घ्या…
एका दिवसात किती अंडी खावीत ?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंड्यांचे सेवन हे तुमच्या शारीरिक गरजा आणि हालचालींवर अवलंबून असते. पण, अंड्याच्या पिवळ्या भागात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल असते, ज्यामुळे हृदयविकार वाढू शकतात. मात्र वॉशिंग्टनच्या सरकारी आरोग्य वेबसाइटनुसार, एका अंड्यामध्ये सुमारे 185 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते आणि हृदयरोग टाळण्यासाठी, तुम्हाला दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कोलेस्ट्रॉल मिळायला हवे. त्यामुळे हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी रोज एक अंड्याचे सेवन करावे. मात्र प्रमाणापेक्षा जास्त अंड्याचे सेवन केले गेले तर ते तुम्हाला आजारी देखील पाडू शकते.
अंड्यातील पिवळा भाग खाताय…
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अंडी पूर्णपणे शिजवली पाहिजेत. कारण, कमी शिजवलेल्या अंड्यामुळे संसर्ग होऊ शकतो. अंड्याच्या बाहेरील आणि पिवळ्या भागात साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतात. जे तुमचे आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे जास्त अंडी खाल्ली तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकेल.
अंडी खाण्याचे फायदे
- अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.
- वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.
- अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेसे प्रथिने मिळतात.
- अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.