एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तो दीर्घकाळ चालला. या संपकाळात चालकांविना एसटी प्रवाशांचे मोठे हाल झाले. या कालावधीत एसटी महामंडळाकडून कंत्राटीचालक भरती करून राज्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
(हेही वाचा- भाजपाचे माजी नगरसेवक आजही मोदी-फडणवीस यांच्यावरच अवलंबून)
या विभागास कंत्राटी चालक पुरविण्यास मुदतवाढ
दरम्यान, चंद्रपूर, ठाणे आणि बुलडाणा विभागास कंत्राटी चालक पुरविण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. राज्यात २९ हजारांपेक्षा जास्त एसटी चालक आहेत. काही चालक अन्य विभागात बदली झाल्यानंतर ३ ते ५ वर्षांनंतर पुन्हा मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. याबाबत महामंडळाच्या आदेशात म्हटले आहे की, मुदतवाढ आदेशाची मुदत संपल्याने चंद्रपूर, ठाणे, बुलडाणा आणि अकोला या विभागास अनुक्रमे ५०, १०० , १०० आणि ५० कंत्राटी चालकांना २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
कंत्राटी पद्धतीने चालक कम वाहक पदावर नेमणूक
राज्य शासनाच्या सेवेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. मात्र कामगार न्यायालयाने कर्मचाऱ्यांची ही मागणी फेटळल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांना सेवेत परत येण्याबाबतचे आवाहन केले होते. तरीही संपकरी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे एसटीचा डोलारा सावरण्यासाठी महामंडळाकडून कंपन्यांची नेमणूक करून कंत्राटी पद्धतीने एसटी चालक कम वाहक पदावर बेरोजगार तरुणांच्या नेमणुका केल्या होत्या. यासाठी नेमणुका करत असताना जिल्ह्यामध्ये ५० तरूणांना चालकांचे प्रशिक्षण देण्यात आले. ज्या चालकांकडे पाच वर्षापेक्षा अधिक वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभव आहे, अशांना चालक कम वाहक या पदावर नेमणूक देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. अल्पावधीत प्रशिक्षण देऊन या कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले.
Join Our WhatsApp Community