प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नुपूर शर्मा यांनी जाहीर माफी मागितली. परंतु, हिंदू देवतांबद्दल अपशब्द बरळणाऱ्या अकबरूद्दीन ओवैसीने आजतागायत माफी मागितलेली नाही. त्यावर काय बोलणार असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ते एका मुलाखतीत ते बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबराबद्दल ऐकीव माहिती उद्घृत केली होती. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात जाहीर माफी देखील मागितली. या विषयावरून खूप टीकेची झोड उठली, लोक रस्त्यावर आले. त्यानंतर अनेक लोक क्षमायाचना करीत होते. वास्तविक पाहता नुपूर शर्मा यांनी माफी मागण्याची काहीही गरज नव्हती. त्यांनी जे ऐकले तेच त्या बोलल्या. परंतु, ओवैसीने हिंदू देवतांवर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यांनी कधी माफी मागितली का… ? असा साल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा – चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतर फडणवीसांनी सावरलं; राऊत म्हणाले Ohhh… loud speaker!)
तसेच ओवैसींच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर कुठल्या मुस्लीम देशांनी म्हटले का की, ओवैसींच्या विधानाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. हिंदुत्त्वावर बोलताना राज म्हणाले की, मी हिंदू आहे, माझ्या धर्मावर तुम्ही जाल तर मी हिंदू म्हणून अंगावर येईल. जर तुम्ही मराठीला नख लावले तर मी मराठी म्हणून अंगावर येईल असे राज यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community