Har Ghar Tiranga: आता दिवस-रात्र ‘तिरंगा’ फडकणार! ध्वज संहितेत मोठा बदल

203

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्याचे आवाहन करत आपण सर्व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत या मोहिमेला पाठबळ देऊया, असे म्हटले. तसेच या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील, असेही म्हटले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता घरा-घरावर दिवस-रात्र तिरंगा फडकताना दिसणार आहे. संहितेतील या बदलानुसार, दिवस-रात्र पॉलिस्टरपासून तयार करण्यात आलेले तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला देखील वंदन करता येणार आहे.

(हेही वाचा – केरळनंतर देशाच्या राजधानीत Monkeypox ची एन्ट्री! ३१ वर्षीय युवकाला संसर्ग)

यंदा देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान, हर घर तिरंगा अशी मोहीम राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे सरकार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ (प्रत्येक घरात ध्वजारोहण) उपक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेत करण्यात आलेला बदल महत्त्वाचा मानला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. या पत्रात असे म्हटले की, भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवणे आणि त्याचा वापर करणे हे भारतीय ध्वज संहिता २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ द्वारे नियंत्रित आहे.

भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशाद्वारे आणखी सुधारणा करण्यात आली आहे आणि भारतीय ध्वज संहिता २००२ च्या भाग-II च्या परिच्छेद २.२ च्या खंड (xi) नुसार आता ओळखले जाणार आहे. ध्वज आता रात्रंदिवस फडकवता येणार आहे. यापूर्वी ऋतू कोणताही असो, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिरंगा फडकवण्याची परवानगी होती. भारतीय ध्वज संहिता, २००२ च्या भाग-१ मधील परिच्छेद १.२ आता खालीलप्रमाणे असेल… राष्ट्रध्वज हाताने शिवलेला आणि हाताने विणलेला असावा किंवा कापूस/पॉलिएस्टर/रेशीम खादी बंटिंग यंत्राने बनवलेला असावा. पूर्वी मशीनने बनवलेले आणि पॉलिस्टरचे ध्वज वापरण्यास परवानगी नव्हती.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.