सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअॅप. व्हॉट्सअॅपमुळे कोणाशीही कधीही बोलता येणं शक्य होत असल्याने व्हॉट्सअॅपचा वापर करोडो लोक करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना नव-नवीन फीचर्स देत असतात. अशातच आता पाठविलेला मेसेज डिलीट करणे हे व्हॉट्सअॅपच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक आहे; परंतु केवळ तुम्ही पाठवणारे असाल तरच. जर तुम्ही त्या मेसेजचे रिसिव्हर असाल तर मात्र वाचण्यापूर्वी एखादा मेसेज डिलीट झाला असेल तर काय कराल?
(हेही वाचा – Whatsapp: कोणीही वाचू नये असे Secret Chats लपविण्यासाठी ‘या’ Trick करा फॉलो)
डिलीट केलेला मेसेज वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मेसेज उघडण्यापूर्वी नोटिफिकेशन बार पाहणे, पण मेसेजवर टॅप करून चॅटिंगवर आल्यानंतर मात्र डिलीट मेसेज पुन्हा मिळवण्याचा कोणताही मार्ग नसतो. आता हेदेखील शक्य झाले आहे. डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज WAMR या थर्ड पार्टी अॅपद्वारे तुम्ही वाचू शकता, असे सांगितले जात आहे.
गुगल प्लेवरून WAMR डाउनलोड करा
- WAMR गुगल स्टोअरवरून डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.
- डाऊनलोड केल्यानंतर, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, मेसेंजर, इन्स्टाग्राम इत्यादी अॅप्स निवडण्याचा पर्याय आहे.
- इमेज, व्हिडिओ, व्हॉइस नोट्स, ऑडिओ फाइल्स, स्टिकर्स, जीआयएफ आणि इतर कागदपत्रे यांसारख्या अटॅचमेंट्स पुनर्प्राप्ति करण्याचीही सोय देखील देण्यात आली आहे.