रविवारी सकाळी जुहू किनाऱ्यावर पोरपोईज माशाचा मृतदेह आढळून आला. जुहूच्या नोव्हेटल हॉटेलजवळ मरीन रिस्पॉनडंट ग्रुपला हा मासा मृतावस्थेत आढळला. ही मादी पोरंपॉईज असून, मृत्यूचे कारण शवविच्छेदन केल्यानंतर समजेल, अशी माहिती कांदळवन कक्षाकडून दिली गेली. मात्र जुहू किनाऱ्यावर तेलाचा तवंग नजीकच्या समुद्रकिनाऱ्यावरील समुद्री जीवांना धोकादायक बनल्याची भीती पर्यावरणप्रेमीकडून व्यक्त करण्यात आली.
( हेही वाचा: रेल्वेच्या दुहेरीकरणाअभावी कोकणवासीयांचे प्रवासहाल )
मृत पोरपॉईजच्या शरीरावर दोन-तीन जखमाही आढळून आल्या आहेत. किनाऱ्यावर येताना खडकावर आदळून माशाचा मृत्यू झाल्याचा अंदाज कांदळवन कक्षाकडून व्यक्त करण्यात आला. नुकताच गोराई येथेही व्हेल सदृश माशाचा मृतदेह आढळून आला होता. तिथल्या सागरी जीव रक्षकांनी माशाला पहिल्यादिवशी समुद्रात ढकलले मात्र, दुसऱ्या दिवशी मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आला, त्यावेळी सागरी जीव रक्षकांनी माशाला किनाऱ्यावरच पुरुन टाकले.
Join Our WhatsApp Community