भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै, सोमवारी राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हा शपथ विधी सोहळा सकाळी साडे दहा वाजता संसद भवनात झाला. यावेळी भारताचे सरन्यायधीश रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना ही शपथ दिली असून त्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. पण २५ जुलै हा दिवस भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण २५ जुलैच्या दिवशी दर ५ वर्षांनी देशाला नवा राष्ट्रपती मिळतो. यापूर्वी २५ जुलै रोजीच अनेक राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यामुळे भारताच्या इतिहासात २५ जुलै रोजी ही तारीख राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी ओळखली जाते.
(हेही वाचा – देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ, भावूक होत द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन्…”)
२५ जुलैरोजीच का होतो राष्ट्रपतींचा शपथविधी
राष्ट्रपती हा देशाचा पहिला नागरिक असतो. देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलैला शपथ घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या सहाव्या राष्ट्रपतींनी नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यांच्यानंतर आतापर्यंत देशातील ९ राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण केला.
देशात जेव्हा इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती, त्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी जनता पक्षाच्या माजी नेत्या नीलम संजीव रेड्डी यांना विजय मिळवला होता आणि १९७७ रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर दर पाच वर्षांनी २५ जुलै रोजीच देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती शपथ घेतात.
कोणी-कोणी २५ जुलै रोजी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ
- नीलम संजीव रेड्डी (२५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२)
- ज्ञानी जैल सिंह (२५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७)
- रामास्वामी वेंकटरमन (२५ जुलै १९८७ ते २५ जुलै १९९२)
- शंकरदयाल शर्मा (२५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७)
- केआर नारायनन (२५ जुलै १९९७ ते २५ जुलै २००२)
- एपीजे अब्दुल कलाम (२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७)
- प्रतिभा पाटील (२५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२)
- प्रणब मुखर्जी (२५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७)
- रामनाथ कोविंद (२५ जुलै २०१७ ते २५ जुलै २०२२)