पंतप्रधानांकडून माजी राष्ट्रपतींचा अवमान करणारा ‘आप’च्या नेत्याचा ‘तो’ व्हिडीओ खोटा

159

नव्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती डॅा. रामनाथ कोविंद हे परतत असतांना उपस्थितांना नमस्कार करत जात होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आल्यावर पंतप्रधान मोदी हे त्यांच्याकडे न पाहता वृत्तवाहिन्यांच्या कॅमेराकडे पाहत आहेत, असा व्हिडीओ ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी ट्वीटरवर व्हायरल केला. त्यानंतर हा व्हिडीओ सिंग यांनी जाणीवपूर्वक तोडून मोडून व्हायरल केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे ‘आप’ने पंतप्रधान मोदी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय दाखवले त्या व्हिडीओमध्ये?

‘असा अपमान व्हेरी सॉरी सर, हे लोक असे आहेत, तुमचा कार्यकाळ संपला, आता ते तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत’, अशा आशयाचे ट्वीट ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी केले. या व्हिडीओमध्ये नव्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमानंतर माजी राष्ट्रपती डॅा. रामनाथ कोविंद हे उपस्थितांना संसदेच्या सेंट्रल हॅालमध्ये नमस्कार करत जात होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आल्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याकडे न पाहता वृत्तवाहिनीच्या कॅमेराकडे पाहत आहेत, असा व्हिडीओ ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी ट्वीटरवर व्हायरल केला. यानंतर सोशल मीडियातून असंख्य प्रतिक्रिया उमटू लागल्या. या व्हिडीओला काही तासांतच १० हजार लाईक मिळाले.

भाजपाने ‘तो’ संपूर्ण व्हिडीओ केला व्हायरल

यानंतर भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी यासंबंधीचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल केला. त्यामध्ये जेव्हा माजी राष्ट्रपती डॅा. रामनाथ कोविंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर येतात तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी त्यांना नमस्कार करून त्यांचा आदर केला होता. अशा प्रकारे भाजपाने ‘आप’चा हा खोटारडेपणा उघड केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.