तुम्ही पदवीधर आहात आणि गुगल सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण गुगलमध्ये बंपर भरती निघाल्याचे सांगितले जात आहे. पदवीप्राप्त उमेदवारांना गुगलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. गुगलच्या वेगळेगळ्या ऑफिसमध्ये भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आणि सल्लागार म्हणून काम केलेल्या उमेदवारांना या कंपनीत अर्ज दाखल करता येणार आहे.
असेही सांगितले जात आहे की, गुगलची पार्टनरशीप टीम जाहीरात, रिसर्च, हेल्थ, रिटेल, पेमेंट, पब्लिशिंग, डेव्हलपिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुगलच्या भागीदार संस्थांसह कंपनीच्या गरजा, व्यवस्था, लक्ष्य आणि उत्पन्न मिळवण्यासाठी काम करते.
काय असणार पात्रता
गुगलच्या या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याकरता इच्छुक उमेदवाराला गुगल करिअरच्या पेजवर भेट द्यावी लागणार आहे. तसेच https://careers.google.com/jobs/results/ यावर क्लिक करून अर्ज दाखल करावा लागणार आहे.
गुगल कंपनीला गुगल पार्टनरशीप टीमकरता पदवी प्राप्त आणि आयटी क्षेत्रात अनुभव असलेले उमेदवार हवे आहेत, यांची भरती आयटी, मिडीया, रीटेल, ईकॉमर्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच गेमिंग डिपार्टमेंटमध्ये सल्लाहार पदावर भरती करण्यात येणार आहे.
कुठे असणार जॉब लोकेशन
गुगल कंपनीकडून करण्यात येणारी भरती ही अमेरिकेतील कॅलिफॉर्निया, शिकागो, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, सिएटल, सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन डीसी येथे असणाऱ्या ऑफिसमध्ये अनेक पदांवर होणार आहे.
Join Our WhatsApp Community