व्हिस्टा डोम कोचच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून लागू करण्यात आले. त्यानंतर मुंबई – पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टा डोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आणि आता सोमवारी २५ जुलै २०२२ रोजी प्रगती एक्सप्रेसला तिसरा व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला.
( हेही वाचा : दादर-माहीम, वडाळा आणि धारावीच्या विभागप्रमुख पदासाठी वरळीतील नेता होणार आयात? )
प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मुंबई – गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये ही, काचेचे छत (रुफ) आणि रुंद खिडक्यांसह या डब्ब्यांतून पाहता येतात.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे, मुंबई – पुणे मार्गावरील तिसरा व्हिस्टा डोम डबा 12125/12126 प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला असून सोमवारी पुण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
व्हिस्टा डोम कोचच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये २६ जून २०२१ पासून लागू करण्यात आले. नंतर, मुंबई – पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टा डोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आणि सोमवारी २५ जुलै २०२२ रोजी प्रगती एक्सप्रेसला तिसरा व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला.
व्ह्यूइंग गॅलरी
प्रगती एक्स्प्रेसच्या प्रवाशांना माथेरान टेकडीची दुसरी बाजू पाहण्याचा एक अॅड-ऑन फायदा असेल. कारण ही ट्रेन कर्जत – पनवेल मार्गे मुंबईला जाईल आणि निसर्गाच्या सान्निध्याचा आनंद घेण्यासोबतच सोनगीर टेकडी (पळसधरीजवळ), उल्हास नदी (जांब्रुंग जवळ), उल्हास व्हॅली, खंडाळा, लोणावळा इत्यादी भाग आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील धबधबे, बोगदे. अनोख्या व्हिस्टा डोम कोचमध्ये, काचेच्या छताच्या शीर्षस्थानी असण्यासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोगी सीट आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे इत्यादी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा आहे.
Join Our WhatsApp Community