दारुबंदी असणा-या गुजरातमध्ये विषारी दारुने 25 जणांचा घेतला बळी; चौकशीसाठी SIT ची स्थापना

154

 

राज्यात दारुबंदी असतानाही गुजरातमध्ये विषारी दारुमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद शहरातली ही घटना आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणा-या 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

दारु म्हणून केमिकल विकले

विषारी दारु प्यायल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींनी देशी दारु प्यायल्याचे म्हटले जात होते. मात्र ही देशी दारु नसून केमिकल होते. हे केमिकल एका कंपनीतून चोरुन आणल्याची माहिती देखील समोर आली आहे. देशी दारु म्हणून हे केमिकल लोकांना देण्यात आले. यामध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे. चोरी केलेले केमिकल दारु म्हणून विकले गेले. आतापर्यंत 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी काही लोकांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.