अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधी पक्षांकडून गोंधळ घालणे हे काही देशाला नवीन नाही. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांकडून गदारोळ घातला जात आहे. देशाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे आता खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी लोकसभेत काँग्रेसच्या 4 खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी राज्यसभेतील 19 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एका आठवड्यासाठी निलंबन
सोमवारी लोकसभेत काँग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळानंतर मंगळवारी राज्यसभेतही असाच गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, निलंबित खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव,डॉ. शंतनू सेन,डोला सेन,शांता छेत्री,महम्मद अब्दुल्ला,ए.ए.रहीम,एल यादव,वी.वी.शिवादासन,अबीर रंजन विश्वास,नदीमूल हक यांचा समावेश आहे.
(हेही वाचाः ‘तिथे वसुली शिवाय काहीच नव्हतं…’, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीनंतर चित्रा वाघ यांचा टोला)
महागाई, जीएसटी यांसारख्या अनेक कारणांवरुन विरोधकांनी मंगळवारी सभागृह दणाणून सोडले. सभागृहाचे सत्र सुरू असताना या निलंबित खासदारांनी राज्यसभा सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यामुळे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी एका आठवड्यासाठी या खासदारांचे निलंबन केले आहे.
काँग्रेस खासदारही निलंबित
सोमवारी लोकसभेतही विरोधी पक्ष काँग्रेसच्या खासदारांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली होती. मणिकम टागोर,टीएम प्रतापन,ज्योतिमणी,रम्या हरिदास या खासदारांवर सोमवारी कारवाई करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community